STORYMIRROR

sushant joshi

Others Children

3  

sushant joshi

Others Children

जिगरी यार

जिगरी यार

1 min
260

शाळेतला जीव भावाचा मित्र, ज्याला मी सर्व सांगायचो

कुठलेही सुख दुःख, एकमेकात वाटून घ्यायचो


आमच्या वर्गातील सुखद दिनाचे, आठवतात ते क्षण

हुशार विद्यार्थ्यांचा संघात आम्ही, यायचो दोघे जण


कोणत्याही शालेय स्पर्धेत, आम्ही जोमाने भाग घ्यायचो

स्पर्धेत क्रमांक पटकावला की, मान ताठ करून फिरायचो


दोघेही आम्ही तापट पण, तेवढीच एकमेकांची काळजी

अख्या वर्गात आमची मैत्री, कोणाला सहन नाही व्हायची


मज्जा मस्ती, खट्याळ आम्ही, जग आम्हाला बोलायचे

एका कानाने ऐकायचे, दुसऱ्या कानाने सोडायचे


आमच्या बिनधास्तपणामुळे, आमच्यावर होत असे टीका

कोणी काहीही बोलले तरी, आमची बदलत नसे भूमिका


अख्या शाळेत आमचा वर्ग, होता सर्वात प्रबळ

आमच्या आठवणींची खूण म्हणून, आहे तुटलेला नळ


Rate this content
Log in