आशेची पहाट....
आशेची पहाट....
कविता रचून रात्र ही सरली
वाचकांच्या समीक्षा वाचण्यासाठी पहाट ही उजाडली
लिखाणाची गोडी जपून केली होती एक सुंदरशी कविता
वाटले होते वाचक देतील तिला खूप साऱ्या समीक्षा
पण असे काही झाले नाही
कारण प्रत्येकवेळी आपले स्वप्न पूर्ण होईलच असे नाही
पण खचला तर तो लेखक नाही
कारण काही वेळा त्याचे लिखाणाच खचलेल्यांसाठी प्रेरणा होई
त्यामुळे जपावी लेखणी प्रत्येक लेखकाने
आज नाही तर काय झाले
उद्या आशेच्या किरणांची पहाट पुन्हा उगवणार आहे......