विद्रूप चेहऱ्याचा रंग काहीसा निराळा
विद्रूप चेहऱ्याचा रंग काहीसा निराळा


असे आपल्याच स्वप्नात ती मग्न
पण एकच जिद्द उराशी बाळगे ती स्वप्न करावे पूर्ण आपले निराळे अन् भिन्न....
कसोशीने प्रयत्न करे
दिवस अन् रात्र एक करे
दिसे तिला आईबाबांच्या डोळ्यात आपले पूर्ण झालेले स्वप्न
मग आनंदाने नाचे अन् अभिमानाने सांगे या लाडलीने
पूर्ण केले तुम्ही पाहिलेले एक स्वप्न अपूर्ण
गदागदा हलवूनी आणे कोणी तिला स्वप्नातूनी प्रत्यक्षात
मग स्वतःच उमजे तिला पुन्हा एक प्रेमळ भास झाला
आयुष्यात..
पण एके दिवशी भयानक घटना घडली तिजसोबत
रस्त्यावरी चालताना एका राक्षसाने अँसिड फेकूनी
केला तिचा सुंदर चेहरा विद्रूप..
कळवळली ती अन् फोडल्या घशाने तिच्या किंकाळ्या
पण तिचा तो त्रास दिसला नाही त्या राक्षसाला
काही कालावधीने ती बरी नक्कीच झाली होती
पण इतरांना तिच्या चेहऱ्याची घृणा वाटत होती..
पण यावर मात करत तिच्या सुंदर मनाने पटवून दिले
अख्ख्या जगाला
असे चेहरा जरी विद्रूप तरीही रंग माझा वेगळा