STORYMIRROR

Priyanka More

Inspirational

3  

Priyanka More

Inspirational

माणुसकी..

माणुसकी..

1 min
490

दिल्या घेतल्याचे जग हे सारे

येथे पैश्याविना एकमेंका कोणी न विचारे...

पैसा असेपर्यंत सर्वत्र आपली गरज भासे

निसटला पैसा हातातूनी तेव्हा मात्र स्वतःची

सावलीच केवळ सोबत दिसे...

जन्माला एकटेच आलो

मरताना ही एकटेच जाणार

हे विधिलिखित निश्चित आहे

मग का ? या जीवाची धडपड त्या

पैश्याच्या मागे धावे ...

जीवनाचा प्रवास पैश्यासोबत नाही तर

आपुलकीच्या माणसांसोबत चालायचा आहे 

त्यासाठी धनाला न जपता 

माणसाच्या मनाला जपा

इतरांना जेव्हा तुमच्या साथीची गरज असेल

तेव्हा धर्म,जात, पंथाचे धागे तोडून टाका

अन् माणुसकीच्या एकाच धाग्याला घट्ट धरून

माणूस बनून माणसाच्या हाकेला धावा....



రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Inspirational