गर्भाशयातील मायेचा ओलावा...
गर्भाशयातील मायेचा ओलावा...

1 min

83
तुझ्या उदरात जन्म घेऊनी धन्य मी झाले जननी
काय सांगू तुजला किती भाग्यवान मी...
तुझ्या गर्भाशयातील तो मायेचा ओलावा मी नऊ महिने
अनुभवला आहे
आणि त्यामुळेच माझ्या जीवनाचा पाया आज भक्कमपणे
रोवला आहे...
किती ती स्वतःच्या जीवाची धडपड त्या न पाहिलेल्या
पोटातल्या चिमुकल्यासाठी
आत्ता स्वतःची स्वप्नही ती बाजूला सारणार आहे जन्म
घेणाऱ्या त्या बाळासाठी...
आत्ता एकच इच्छा आहे मनात जर पुन्हा जन्म घ्यायला
मिळाला तर तो घ्यावा फक्त तुझ्याच पोटी...
आई...