Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priyanka More

Others

4.5  

Priyanka More

Others

आईची माया ( अभंगरचना )

आईची माया ( अभंगरचना )

1 min
99

आईची माया कोणही न जाणे

मायेचा तो स्पर्श कोणालाही न कळे I

कैसे हे कलियुग आले देवा जेथे एक पुत्रच

सख्ख्या आईबापाला हाणे II१II

भर रस्त्यावर एका कोपऱ्यात माय पुत्राविना विव्हळे I

ऐसा पुत्र होणेपरीस निपुत्रिक असणे चांगले II२II

पुसा त्या लेकरांना आईची माया

ज्यांनी मायेचे छत्र बालपणीच हरवले I

ज्ञानोबा माऊली असूनी जगाची त्यांनी

अनाथपण भोगिले II३II

थोर राजा आपला शिवबा होऊनी गेला I

मात्र त्यामागे नसता हात जिजाचा तर

अवघा हा मराठा नसता राहिला या जगता II४II

अशी ही थोर मायमाऊली माझी I

वर्णावी किती तिची ही थोरवी अन् महती II५II

एकच मागणे आहे पांडुरंगा तुजपाशी I

नको खितपत पडू देऊस कोणत्याही माऊलीला रस्त्याच्या

एका कोपऱ्यापाशी II६II

Rate this content
Log in