आज मन अधीर झाले...
आज मन अधीर झाले...
आठवण तिची येऊनी आज मन अधीर झाले
काही क्षण का होईना माझे मन भूतकाळात रममाण झाले
हा थंडगार वारा अंगावर शहारे आणत होता
आणि प्रत्येक शहारा तिच्या स्पर्शाची जाणीव करून देत होता
आज ती सोबत नसली तरी तिच्या आठवणी हृदयात आहेत
आणि आयुष्यभर अश्याच तिच्या आठवणी आठवूनी माझे
मन अधीर होणार आहे...