STORYMIRROR

Priyanka More

Tragedy Others

4  

Priyanka More

Tragedy Others

बळीराजा....

बळीराजा....

1 min
183

काळी माती, नांगर, ढवल्या पवळ्याची जोडी इतकचं

ज्याचं विश्व असे

या स्वार्थी दुनियेत बळीराजाला कोणीच न पूसे...

त्यानेच पिकवलेल्या तुकड्यावर जगतो आपण

पण त्याच्या कष्टाचं मोल देताना त्यालाच प्रश्न करतो कोण आपण?

उन्हात घाम गाळूनही निसर्गाच्या कोपाला धीराने

सामोरे जातो

पण मेहनीतच फळ मिळेल ह्याची निरागस आशा बाळगतो

तो अन्न पिकवतो म्हणून आपल्याला मिळते

जगण्याची शक्ती

तरीही त्याची किंमत सारेच कवडीमोल करती

काहीही काम न करता राजकारण्यांच्या पोटी बक्कळ पैसा

मात्र जो कसलीच तमा न बाळगता शेतात राबतो

त्याचा जीव एका वेळेच्या अन्नासाठी होई येडापिसा

सतत दुसऱ्यांचा विचार करी, इतरांच्या सुखासाठी शेतात

झोकून देऊन काम करी

पण कसली वेळ आली रे देवा मोकळ्या मनाने फक्त आनंद

देणारा शेतकरीराजाच इथे फासावर जाई....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy