STORYMIRROR

Priyanka More

Romance

2  

Priyanka More

Romance

स्त्रीचे शृंगारत्व....

स्त्रीचे शृंगारत्व....

1 min
116

आज कवितांच्या दुनियेतून जरा बाहेर यावेसे वाटले.

कागदावर लिखाण न करता त्याला जरा रंगवावेसे वाटले...

पेन्सिलने छटा काढत काढत कानाचे चित्र उमटले

स्त्रीच्या शृंगारतेला जोड म्हणून मी त्यात झुमक्याला बंदिस्त केले..

छटा काढत काढत पूर्णच होत होते चित्र

तेवढ्यात कान आणि डोळे वाद करू लागले एकमेकांशी

असूनही ते घट्ट मित्र...

मग काय डोळ्यांची पापणीही उमटली कानांच्या बाजूला

पापणी वर होताच नजरेतील त्या चमकेने घायाळ केले माझ्या हृदयाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance