विरह सैनिकांचा..
विरह सैनिकांचा..
विरह काय असतो ते सिमेवरती प्राणाची बाजी लावणाऱ्या
सैनिकाला विचारा
प्रेमाचा खरा अर्थ त्याच्याकडूनच जाणुनी घ्यावा..
विरहाच्या खऱ्या संवेदना सैनिकासच उमगती
माय- बाप बहिण पत्नी यांच्या प्रेमास ते कायम दुरावती
भारत मातेच रक्षण हा एकच ध्यास असतो मनी
यापुढे सारेच फिके वाटे त्यांसी या जीवनी
तरुण तरुणी सारेच एकमेंकावर प्रेम करती
पण सैनिकांसारखे भारत मातेच्या रक्षणार्थ फारच
कमी युवा पुढे धजावती..
करु शकत नसलो जरी सिमेवरती जाऊन रक्षण
तरी समाजामध्ये वावरत असताना अन्यायाला चुरडून
नेहमी सत्याचेच करू समर्थन
ते तिथे लढतात म्हणून सुखाची झोप घेतो आपण
म्हणूनच समाजाचं काहीतरी देणं लागतो याच सतत
असावं थोडेतरी भान..........