आता तरी जाग...
आता तरी जाग...
नम्रता स्वीकार । अहंभाव सोड।
माणसाला जोड। अंत उद्या॥१॥
चढता अंगात । अहंकार विष।
माणुसकी नाश। होत असे॥२॥
जाती,धर्म, भाषा । नको विटंबना ।
सन्मान भावना । एकात्मता ॥३॥
सत्यमार्गी लाग। ध्येयाकडे धाव।
मिळवून नाव । सार्थ कर॥४॥
करून अभ्यास । मिळवून ज्ञान ।
भारताचा मान। वाढवावे॥५॥
माणसा माणसा। अहंकार त्याग ।
आता तरी जाग। अस्तित्वाला ॥६॥
बोलावे अभ्यास । पहावे अभ्यास ।
लिहावे अभ्यास । संगू म्हणे॥७॥