माझा कलाम होता तो
माझा कलाम होता तो
देशासाठी भूक तहान विसरुनी रात्र - रात्रभर
जागणारा माझा मार्गदर्शक कलाम होता तो
महासत्तेसाठी नित्य युवकांकडे अग्निबाणासम
भागणारा माझा मिसाईलमॅन कलाम होता तो
विसरुनी स्वतःचा मोठेपणा पहिला कार्यास
लागणारा माझा खरा नेता कलाम होता तो
पायाशी ऐश्वर्य असूनी सर्वांशी साधेपणाने
वागणारा माझा राष्ट्रपती कलाम होता तो
सर्वांची देशभक्ती जागवून देशाप्रती कृतज्ञता
मागणारा माझा देशभक्त कलाम होता तो
