STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Romance Others

3  

Prashant Tribhuwan

Romance Others

अनोळखी भेट

अनोळखी भेट

1 min
469

चुकलेल्या त्या वाटांवर ती

झाली एक अनोळखी भेट

पहिल्याच त्या भेटीमध्ये

केले काळजात घर थेट


रस्ते इथले सारे नागमोडी

त्यावर झाला हृदयाचा मेळ

दिवस सरतो अन् रात्रही

पण असह्य होते ही कातरवेळ


तू वाऱ्याच्या झुळकी प्रमाणे

मज अशी स्पर्शून जाते

ही उन्हाची तप्त दुपार

मग गुलाबी सांज होते


जशी राहते तू मनात माझ्या

तशी या जीवनात यावी

अंधारलेली ही कळी रात्र

तुझ्या माझ्या प्रीतीत न्हावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance