पर्यावरण
पर्यावरण
1 min
182
जिकडे पहावे तिकडे
चालला पर्यावरणाचा ऱ्हास
झाले इतके प्रदूषण की
मिळेना मोकळा श्वास
सारे झाले भोगवादी
तोडली त्यांनी झाडे
कसे चालेल सांगा आता
मानवाचे जीवनाचे गाडे
जीवन ज्याचे नाव
ते पाणी विकत मिळते
जपून आता वापरावे
हे सांगूनही कुठे कळते
जिला म्हणतात माता
ती होती किती सुपीक
वापरून रासायनिक खते
ती देखील केली नापीक
नाही वाचवले पर्यावरण
निश्चित आहे आपला अंत
कळते सर्वांना आहे हे
तरीदेखील नाही खंत
