STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Tragedy

3  

Prashant Tribhuwan

Tragedy

काय करू?

काय करू?

1 min
259

मी हसू की रडू

सांगा काय करू

जगू हे दुःख की

निपचीत   मरू


वाटतो  बोलका

परी  राहे  शांत

कोणी ना आपले

हीच मनी भ्रांत


सुखात  सगळे

जवळी  येतात

दुःख  दिसताच

सोडून   देतात


मनी   साठवून

अश्रूंचा  पसारा

आभासी मिळतो

मजला किनारा


आभासी जीवन

आभासी मरण

देवा...एकदा तू

आपले तू म्हण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy