कोण खळी ?
कोण खळी ?
माझ्या हृदयातील श्वास खळी
करते सदा दुःखाचा ह्रास खळी
दुःखात जगण्याची आस खळी
पहाटेच्या स्वप्नातील भास खळी
कधीही न तुटणार विश्वास खळी
प्रेमाचा फुललेला भाव खळी
या मनात कोरलेले नाव खळी
स्वप्नाच्या पल्याडचे गाव खळी
मनास लागलेला लगाव खळी
तरीही सोबतीचा अभाव खळी
निस्वार्थ प्रेमाची माऊली खळी
साथ न सोडणारे सावली खळी
पहिल्या नजरेत च भावली खळी
मनाच्या कोपऱ्यात गावली खळी
पडता सावरण्यास धावली खळी
आयुष्यभर विरहात जगणे खळी
तिला चोरुन चोरुन बघणे खळी
रात्रंदिवस झुरायला लागणे खळी
माझे हे येड्यासारखे वागणे खळी
प्रार्थनेतील देवाकडचे मागणे खळी
कधीही दिले वचन न मोडणारी खळी
रुसवे फुगवे क्षणात तोडणारी खळी
प्रत्येक श्वासा श्वासात राहणारी खळी
माझ्या प्रेमाचा अंत पाहणारी खळी
अश्रुरुप डोळ्यातून वाहणारी खळी