झोपडी
झोपडी
1 min
239
आईसम मायेची ऊब देणारी
वात्सल्याने जवळ करणारी
ती झोपडी बघा वाटते किती छान
प्रत्येक वेळी मला जवळ करणारी
नाही तिथे मोठ्या सुख सोई
तरीही ती आपल्याशी वाटते
पाहून त्या आईबाबाचे प्रेम
या नयनात आज आसवे दाटते
आज्जी आजोबांचे प्रेम निरागस
त्यांच्या गोष्टी जीवना वाट दावते
अंगणातील ते तुळशीचे वृंदावन
आजही माझ्या ह्या मनास भावते
खेड्यातील मित्रांची बात निराळी
बोर चिंचाची आहे मजा वेगळी
सुटले गाव झोपडी अन् सर्व काही
विलीन आठवणीत माणसे सगळी
