STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Inspirational Others

4  

Prashant Tribhuwan

Inspirational Others

म्हणून आई हो !

म्हणून आई हो !

1 min
254

तुझ्या तेजाने जग सारे दिपून जात आहे,

बालकावर त्या पाळणाघरात संस्कार होत आहे !

म्हणून तु कर त्याच्यावर जिजाऊ सारखे संस्कार,

तरच येईल त्याला शिवबासारखा आकार!१!


ज्या बालकांचे पोषण करतेय सुकडीचे राशन,

कसे करेल तो समाजात आईबापाचे नाव रोशन?

म्हणून तू दे त्याला प्रेमरूपी वात्सल्याचा पाझर,

तिन्ही लोकी करेल तो आईबापाच्या नावाचा गजर!२!


तुझ्या विकासाचे झेंडे सारी दुनिया पाहत आहे,

पण मुलांचे ते अश्रू तुझ्या पदराविन वाहत आहे!

म्हणून बसून त्याच्याजवळ जाणून घे त्याचे सारे दुःख,

झाला तुझ्याजवळ मनमोकळा की वाटेल दोघांनाही सुख!३!


जसे गेले पँट शर्ट मध्ये तुझे चोळी अन् पातळ,

तशी तुझी मायाही दिवसेदिवस होते पातळ!

म्हणून कर त्याच्यावर निस्सीम प्रेम,संस्कार अन् माया,

तूच सांग मग कसा जाईल भोगवादात वाया!४!


जे तू पेरल त्याच्यात तसाच तो होत गेला,

पैसा पैसा करन शिकवलं अन् तोही पैश्याचाच होत गेला!

म्हणून अजूनही वेळ आहे कर त्याच्यात देशप्रेमाची पेरणी,

मग बघ कितीही शिकला तरी तोही विसरणार नाही जन्मदेती धरणी!५!


रडले बाळ दुःखाने तर तू पुसायची मायेच्या पदराने,

म्हणून तर सुखातही त्याच्या तो नाव घ्यायचा आदराने!

म्हणून अजूनही वेळ आहे जपून ठेव संस्कार अन् मायेचा पदर,

नाहीतर येती पिढी विसरून जाईल काय असतो मोठ्यांचा आदर!६!


त्यालाही वाटत असेल तुझ्या कुशीत बसावे,

रडाव त्याने मनमोकळ अन् तू अश्रू पुसावे!

म्हणून भरले वात्सल्य तुझ्यात तर एक बाई हो,

दिलाय जन्म मुलाला तर एक आई हो!७!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational