STORYMIRROR

Rajkumar Morge

Inspirational

3  

Rajkumar Morge

Inspirational

जिंदगी है

जिंदगी है

1 min
215

सारून संकटांना गीत गाणे जिंदगी है ।

घेऊन वेदना उराशी जरा हसणे जिंदगी है ।।


आले यश मोठे पदरात जरी परिश्रमाने ।

विष घातक अपयशाचे पचवणे जिंदगी है ।।


अधुऱ्या प्रेमाची जखम आहे मनात तुझ्या ।

अशा प्रेमाला जीवनभर जपणे जिंदगी है ।।


शत्रू भरपूर झाले प्रेमाच्या वाटेवर जरी ।

अशा शत्रूंना मनातून भेटणे जिंदगी है ।।


आठवणीत घातले अनमोल क्षण ज्याने ।

अश्या प्रेमाला जागे  करणे जिंदगी है ।।


नाही जाण ज्याची असे बंध जुळणार कसे ।

अशा तुटलेल्या बंधाना जुळवणे जिंदगी है ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational