माय मराठी
माय मराठी
महाराष्ट्राची शान मराठी
मनामनातील अभिमान मराठी...
झाडे - वेली, पशु - पाखरे
सह्याद्रीचा आवाज मराठी...
ना द्वेष ना भिती कशाची
अन्यायाशी तलवार मराठी...
भू - मातेच्या अंगावरली
हिरवळीची सलवार मराठी...
उच-नीच ना गरीब - श्रीमंत
सर्वांग सुंदर माय मराठी...
आनंदाने बागडणाऱ्या
सुगंधी फुलातील मकरंद मराठी...
अनेक जरी रूपे तुझीया
तरी काळजाची साद मराठी...
अंधारलेल्या काळोखातील
नव तेजाची पहाट मराठी...
