◆ धुक्यातील पहाट ◆
◆ धुक्यातील पहाट ◆
होऊन स्वैर उडावे
माझ्या मनात वाटे ,
झोम्बे अंगास वारा
या धुक्यातील पहाटे ........।
झाले आभाळ अंधुक
धरती श्वेत वस्त्र ल्याली,
पाहून रूप मनोहर
कळी हसेल गाली ,
गाईल सुरेख पाखरूही
मग गीत आनंदाचे ,
झोम्बे अंगास वारा
या धुक्यातील पहाटे ........।
ओलाव्याची आस लागली,
गोजिऱ्या वृक्षाला ,
न सांगता हवेत अलगत
हळूच गारवा आला ,
पडतील मग पानावरती
मोती दवबिंदूचे ,
झोम्बे अंगास वारा
या धुक्यातील पहाटे ........।
