STORYMIRROR

Rajkumar Morge

Inspirational

3  

Rajkumar Morge

Inspirational

वळण जीवनाचे

वळण जीवनाचे

1 min
301

फिरून मागे पाहिले वळणावर जीवनाच्या

खुणाच उरल्या नुसत्या चालत्या पावलांच्या


पाहिलेत पुष्कळ वणवे पेटताना घरास येथे

उंबराही झाला फितूर तोडून नाळ घराच्या


शोधात मृगजळ सुखाच्या माणूस आज आहे

होतो अंधुक भास्करही आड गडद ढगांच्या


आणले गोत्यात उन्हाने सोसवेना सावलीही

गेली भिजूनी जिंदगी पावसात आठवांच्या


मी प्रश्न टाकलेला होता डोळ्यात थिजलेला

का अडवले उत्तराला कुंपणाने पापण्यांच्या


होती अंधारली रात्र काजळासमान भासे

तरी काजव्याने छेडील्या तार काळजाच्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational