STORYMIRROR

Rajkumar Morge

Others

3  

Rajkumar Morge

Others

झाड...!

झाड...!

1 min
234

जिथं तापतया तिथच शोधावा ओलावा रं

झाडे जगवूनिया निसर्ग करू या हिरवा ...


कधी पहावे झाड लावूनं

त्याला थोडेसे पाणी घालूनं

मोठे करून सुगंधी श्वास घेऊनं

 मग घेतील सगळे विसावा रं

झाडे जगवूनिया निसर्ग करू या हिरवा...


 झाडे देतील शितल छाया 

गोड मधुर फळे चाखाया 

मनी संकल्प धरूनं

सेवाकार्य करूनं

माळरान सारं फुलवा रं

झाडे जगवूनिया निसर्ग करू या हिरवा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन