STORYMIRROR

Rajkumar Morge

Others

3  

Rajkumar Morge

Others

सोहळा दिपोत्सव

सोहळा दिपोत्सव

1 min
375

आला  दिवाळी  पाडवा

भाऊबिजेचा सण

ओवाळीते बंधुराया 

तुझी  मायाळू  बहीण


करी औक्षण मनोभावे

लावे कपाळी टिळा

हळू मायेच्या स्पर्शाने 

फुलवी नात्याचा मळा


अत्तरी गंध उटण्याचा

लेप अंगाला लावते

मिळो शौर्य भाऊराया

वर  देवाला मागते


भेट देऊन स्नेहाची

भाऊ करे बोळवण

पाणावले डोळे सांगे

ठेव मायेची आठवण


दिवा पणती लावून

देऊ नात्याला उजाळा

करू संपन्न साजिरा

दिपोत्सवाचा सोहळा


Rate this content
Log in