आठवणीतील बाप
आठवणीतील बाप
1 min
260
साऱ्या जगाचा पोशिंदा
कधी नसे जिवाची हाव
कुटुंबाच्या कळपातील
बाप हेच त्याचं नाव...
ठेऊन उपाशी उदरं
खळगी दुसऱ्याची भरितो
धरणी मातेच्या कुशीत
जणू बाप सपान पेरतो
दुःख सारे पचवितो
अन् सोसतो सारा घाव...
आपलीच सारी स्वप्ने
पाडसाच्या डोळ्यात पहातो
द्यावया त्यांनाच आकार
सारी हयात घालतो
स्वार्थीयांच्या या रांगेत
नसतो कधीच याचा ठाव...
ठिगळ रफ्फुचे कपडे
अन् पाय चाले अनवाणी
सटवाईने कशी रं लिहली
मेहनत त्याच्या भाळी
हृदयात जागा त्याची
नको नुसते नावापुढे नाव...
