Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Ghotkar

Inspirational

4.0  

Anil Ghotkar

Inspirational

!! व्यथा वारकऱ्यांची !!

!! व्यथा वारकऱ्यांची !!

1 min
167


पांडुरंगा तुझ्या दर्शनाला आतुर झाले रे मन !

या वर्षी तरी पंढरपुर नगरी होईल का रे दर्शन !!


सवय जडली आहे जीवाला वारीची !

टाळ मृदुंग यासवे आनंदे नाचण्याची !!


सवंगडी माझे सारे आहेत आसुसले रे !

पांडुरंगा यंदा तरी सगळ्यांची वारी घडू दे रे !!


पालखी घेऊन चालता-चालता देहभान विसरते !

भूक-तहान ऊन,पाऊस कसलीही तमा नसते !!


दिवसागणिक असती पादुका आमच्या सोबत !

कधी उभे रिंगण कधी गोल रिंगण असतो खेळत !!


चालताना गरजत असतो ज्ञानोबा माऊली तुका !

पांडुरंगा तुझ्या दर्शनास असे रे जीव हा भुका !!


नको आम्हाला पंचपक्वान्ने वा मिष्टांन्ने भोजनास !

वारकर्यां संगे प्रसाद ग्रहणाची मजा असे खास !!


वाहत आहे दुथडी भरून चंद्रभागा !

या जगी चे सर्व संकट वाहून जाऊ दे गा !!


पुन्हा भरुदे पंढरी नगरी भक्तांचा मेळा !

एकच आस याची डोळे बघावा हा सोहळा !!


पांडुरंगा आता नाही रे धरवत धीर !

तुझ्या दर्शनास जीव झाला रे अधीर !!


Rate this content
Log in

More marathi poem from Anil Ghotkar

Similar marathi poem from Inspirational