STORYMIRROR

Ashu Chavan

Inspirational

3  

Ashu Chavan

Inspirational

मनाचा कप्पा

मनाचा कप्पा

1 min
182

असावेत मनाचे असे काही कप्पे  स्वत:साठीच उघडणारे.... 

नको तिथे कोणाचीही लुडबुड, व्यर्थ बोल अन् उपदेश-सल्ले. 

स्वत:च्या मनाला गोंजारायला....भळभळत्या जखमेवर मलम लावायला....

स्वतःच स्वतःला सावरायला, अन् स्वतःच गुज सांगायला.... 

असावेत मनाचे असे काही कप्पेजे स्वत:साठीच उघडणारे.... 

नसतं इथं कुणीच कुणाचं, सर्वच जण आपल्याच विवंचनेत 

"तुझ्यासाठी काही पण", किंवा "फक्त तुझ्याचसाठी हं" ..

.म्हणणारेच भोवताली सारे.... मात्र जेव्हा खरंच गरज असते, 

मदतीची, वेळेची, साथी सोबतीचीतेव्हा जवळ मात्र कोणीही नसतं, 

अशा वेळी कोणाच्याही मदतीवर  विसंबून न राहता  

खोलावा मनाचा तो सुंदर कप्पा  अन् करावा स्वत:च स्वत:शी सुसंवाद...  

 इतरांपेक्षा तो जरा जास्तच  स्पष्ट सल्ला देऊन जाईल,  

दुबळ्या मनाला कणखरही बनवेल. इतरांच्या सोबतीच्या अपेक्षेने 

पांगळ्या झालेल्या मनाला  जरा मुरड घालून खरंच   गरज असते

मनाचा तो कप्पा उघडण्याची....   

तेव्हा आजच उघडूया मनाचा तो सुंदर कप्पा   

असतीलच जर आतमध्ये   निराशेची जळमटं अन् संभ्रमाची धूळ...  

तर आत्मविश्वासाच्या केरसुणीने   करूयात ती स्वच्छ   

आकांक्षेचे तोरण लावून   हास्याची रांगोळी रंगवून    

सजवुया त्या कप्प्याला आंतरबाह्य  कारण,

असावेत मनाचे असे काही कप्पे   जे स्वत:साठीच उघडणारे.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational