STORYMIRROR

Deepali Mathane

Inspirational

3  

Deepali Mathane

Inspirational

स्त्रियांसाठी योजना

स्त्रियांसाठी योजना

1 min
224

 अनंतकाळाची माता

जननी या जगताची

मातृत्व लाभ योजना

तिच्या ममतारुपी स्वागताची

   गुन्हेगारी प्रवृत्तीला वचक

  महिला हेल्पलाईन नंबरची

   स्त्रियांवरील अत्याचाराला

   तुच वाचा फोड हिम्मतीची

घरकुल सांभाळून मायेनं

कला अवगत बचतीची

घरातील लहान-थोरांसंगे

सजली अष्टभुजा शक्तीची

   लेक घरादाराचं चांदणं

   काय गरज स्त्री भ्रूण हत्येची

   शिकवा हो मुलींना पण

   थोडी जाण असू द्या नितीमत्तेची

गरिब मायबहिणींची 

सारखी कसरत चुलीवरची

धुराळलेल्या डोळ्यांना साथ

उज्वला गॅस योजनेची

    व्हावी कन्या प्रज्ञावान ही ईच्छा

    सुकन्या समृद्धी योजनेची

    संसार व्हावा सुखी लेकीचा

    या एकाच कोमल भावनेची

आजच्या नारीशक्तीला 

 साथ अनेक योजनांची

प्रगतीच्या पावलांना लाभली

 अनंत गती तिच्या स्वप्नांची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational