कविता
कविता
काळ लोटला गेली शतके
समतेच्या तत्त्वाने भरली पाने
आयुष्य कित्येकांनी समतेसाठी झिजवले
सोडली नाही पाठ विषमतेने
संपली नाही गरिबी कधीही
नुसत्या पोकळ भाषणबाजीने
आजही तफावत कायम आहे
गरीब श्रीमंती च्या दरीने
किती आले किती गेले
समता आणली प्रयत्नाने
जोडे कुणी झिजवले
जागृत केले कुणी लेखणीने
फुले शाहू आंबेडकरांच्या
विचारात बीज होते समतेचे
पायाभरणी होईल प्रगतीची
तेच मूळ आहे एकतेचे
बंधुतवाचे नाते जपून
वाटचाल करू योग्य दिशेने
अखंडत्व भारताचे जापण्यास
पाऊल पुढे पडू द्या समतेचे
