सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले
दिन उगवला सोन्याचा
थोर सावित्रीच्या जन्माचा
स्त्रीजीवन उद्धारण्यास होता
हात पाठीशी परमेश्वराचा
सावित्रीने घडविला नवा इतिहास स्त्रीजन्माचा
ज्योतिबांशी विवाह झाला
श्रीगणेशा झाला शिक्षणाचा
विदयेने जागृत झाले मन
घेतला वसा स्त्रीशिक्षणाचा
सावित्रीने घडविला नवा इतिहास स्त्रीजन्माचा
लोकनिंदा सहन करुनी
केला प्रयत्न स्त्रीकल्याणाचा
मुलींची शाळा उभारुन
घरोघरी नेला दिवा ज्ञानाचा
सावित्रीने घडविला नवा इतिहास स्त्रीजन्माचा
मुलासाठी नव्हता सूर निराशेचा
गरिबांची मुले आपली मानण्याचा
शासनाने हात दिला मदतीचा
सन्मान केला देऊन हारतुय्राचा
सावित्रीने घडविला नवा इतिहास स्त्रीजन्माचा
पतीची साथ नव्हती जन्मभर
अर्ध्यावर डाव मोडला संसाराचा
दुःख गिळून सारे
कार्यभार सांभाळला पतीचा
सावित्रीने घडविला नवा इतिहास स्त्रीजन्माचा
युगानुयुगे तेवत राहिल दिवा हा ज्योतिबांचा