Ravindra Gaikwad

Inspirational

4.0  

Ravindra Gaikwad

Inspirational

माणसात माणूस असतो..

माणसात माणूस असतो..

1 min
237


आई तुझ्या चरणी मी

विनम्रपणे झुकलो आहे,

माणसात माणूस असतो

एवढे मी शिकलो आहे...


माणसाची जात न्यारी

माणसाचा धर्म न्यारा,

सोनं ढोंग माणसाचे

रंग बदलू सरडा बरा.

मानवतेची शिकवण देवून

मी पण शेवटी थकलो आहे...


बोलतो एक, चालतो एक

एकमेकांना मारतो मेक,

स्वताच्या भल्यासाठी

दुसऱ्या वरती दगडफेक.

अशा लोकांच्या विरोधात

खंबीरपणे उभा मी टाकलो आहे...


कुठवर बघुन गप्पा राहायचं

अन्याय तरी कुठवर साहायचं?

आता ठरवलंय लढत राहायचं

सत्त्यालाच साथ द्यायचं.

पेटविण्या दिशा दाही

मीच मशाल घेऊन उठलो आहे...


लेखणीची घेऊन तलवार

पाखंडयांवर करण्या वार,

विजय पताका खांद्यावर

ना मज भय ना हार.

दूर करण्या अंधारास या

मीच आता पेटलो आहे...


क्रांतीची माझी भाषा

पेटून उठल्या दाही दिशा,

तिमीरातूनी तेजाकडे

ये भास्करा ,ये प्रकाशा.

घडविण्या इतिहास नवा

दंड मी ठोकलो आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational