Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

आईची आठवण...

आईची आठवण...

1 min
199


येते मज रात्रंदिन

आई तुझी आठवण...

गेलीस कशी सोडून आई

जगू कसा मी तुजविण...?


वाढलो मी नऊ महिने

तुझ्या उदरात ,

तुच दिला जन्म आई

मला या दुनियेत...

तुझ्या सर्व उपकाराची

आहे मज जाण...


खूप केलंस कष्ट आई

आम्हा लेकरासाठी,

सारा आम्हावर जीव 

स्वप्न तुझी ती मोठी.

केलीस सांभाळ आई

सारा लावून तू प्राण...


आठवण येते आई

येती अश्रू डोळ्यात,

तुजविण कोण आई

आहे साऱ्या दुनियेत 

शत जन्म न फिटणार

आई तुझे ते ॠण...


कुठे शोधू तुला आई ?

साऱ्या या दुनियेत ,

तुझ्या लेकरासाठी तू

येशील का धावत ?

वाट पाहू का तुझी मी आई

डोळ्यात आणून प्राण...


तुला नेणारा दूर

कसला तो देव ?

तुझ्या लेकरांची नाही

आली देवाला ही कीव,

सोडून सारं माग आई

का सोडलीस प्राण...?


आठवण तुझी येता

कंठ हा दाटून येई,

आम्हा लेकरासाठी

तुच होतीस सर्व काही,

गेलं सारंच आमचं

झालं जगणं कठीण...


काय सांगू आई आमचे

तुझ्याविना काय हाल,

वाळवंट च झालं जीवन

जीवन च आमचं संपलं 

सोडून तू गेलीस आई

आहे जगी आम्हा कोण.?


पाण्याविना जसा मासा

जीव झाला वेडा तसा,

सहवास तुझा आई

होता आम्हा हवासा,

आटले ग रडून डोळे

येतील अश्रू तरी कोठून...?


तुझ्यासाठी घेईन आई

देवाचा मी त्या जीव,

काय दिले तुला देवाने ?

करून आयुष्यभर देव देव

ताटातूट माय लेकरांची 

घडलं पाप देवा हातून...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract