STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational

क्षितिज...

क्षितिज...

1 min
18

कीर्तीचा डंका वाजो तुझ्या 

घे कवेत सारे क्षितिज,

यशाच्या शिखरावर तू

शोभावा शिरी तो ताज...


हेवा वाटावा जगाला 

हो एवढा तू महान,

इतिहास घडवावा तू

आम्हा वाटावा अभिमान...


तू आदर्श दे जगाला,

जगी व्हावे तुझेच नाव,

घाल गवसणी आकाशाला 

ते आकाश ठेंगणं व्हावं...


व्यापून टाक सारेच 

तुझ्या कीर्ती ने क्षितिज,

तुझ्या जयजयकाराचा 

दुमदुमेल रे आवाज...


क्षितीजावरी घडे मिलन 

जशे धरती अंबराचे,

चरण तुझे स्पर्शूनीया 

व्हावे गर्वहरण दुष्टांचे...


तू सूर्य क्षितीजावरी

झाला दूर अंधार,

आम्ही करतो तुजला 

विनम्र वंदन त्रिवार...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational