STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Tragedy Crime

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Tragedy Crime

तुझ्या मरणाची वाट पाहात...

तुझ्या मरणाची वाट पाहात...

2 mins
0

तू जर असतीस तर..

 आज तू जर असतीस तर आनंदाच्या डोहामध्ये तरलो असतों,
मनातल्या मनात झुरलो नसतो,
 जळत्या मेणबत्ती सारखं स्वतः खाली अंधार घेऊन जागच्या जागी च जिरलो नसतो..
 जीत असती माझीच सदा
कधीच जीवनात हरलो नसतो,
 असं बळ आलं असतं की सुर्याला ही त्या धरलो असतो.
 तू जर असतीस तर ..
नशीब हे माझे दूर माझ्यापासून गेले नसते,
डोळे हे माझे कधीच ओले झाले नसते .
माझ्या मनीचे स्वप्न सारे कधीच साकार झाले असते..
 देवाने ही सारे काही मागीतलेले दिले असते .
जवळचे तर सोडून दे पण
दुरचे ही जवळ आले असते.
  दुःखाला पळवून लावून सुख पायी लोळण घेतले असते...
 सार्थक माझ्या जीवनाचे खरोखरच झाले असते
 तू जर असतीस तर...
तू जर असतीस तर मला च माझ्या जगण्याचा तिरस्कार आला नसता
 अन्न असून जीव हा उपाशी मेला नसता...

 सोडून दिलंय मी ते सारं नी सर्व काही विसरून गेलोय,
तूच कर विचार थोडा किती कुणाचं वाटोळं झालंय...
 तू बरबाद केलेल्या रस्त्यावर टाकलेल्या जीवनाचं
 लेकराचं भलं कोणी केलं हे विचार तू स्वतःला...
तिच्या शापाने तू तर अळ्या पडून,सडून तडफडून मरायला हवं
 ...वास उटेल नी मरण मागशील तू मरण...
कुत्र्यांचं शेपूट वाकडंच अजून ही तुझीच लाल ..
पण किती वाटोळं झालं नी कुत्र्यासारखे जगतेस मी नाही सारी दुनिया थुंकते तुझ्या जगण्यावर
 न घरका ना घाट का...
म्हणलं होतं कोणी तरी 
आंबाडा सडावा तसं सडचील म्हणून 
आज ते आठवून पाहा 
जगतेस काय...
माझं... माझं काय ..आहे माझा संसार सुखात ..
बायको लेकरं घरदार अजून देवाने काय द्यावे... देवाचेच आशिर्वाद खरंच... खरंच सुखात आहे... अगदी सुखात...
 तुझ्या मरणाची वाट पाहत...😁


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Drama