STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance Action Inspirational

तिच्या प्रेमात पडलोय मी

तिच्या प्रेमात पडलोय मी

1 min
6

 तिच्या प्रेमात पडलोय मी... '. पुष्पाग्रज '

 रंगारुपानं आहे ती छान
 हारपून माझं गेलया भान ,
 सांगा आता इलाज काय ? तिच्या प्रेमात पडलोय मी
 झोप येतच नाय...

 बोलतेय गोड लावीते ओढ,
 पाहून गालात हसतेय थोडं
 तिच्या रुपात जादू हाय...
 झोप येतच नाय...

 नजरेत भरलाय तिचा गोरा रंग पाहून तिला मी होतोय दंग कळेना करावं काय...
 झोप येतच नाय...

 चोरुन बघते ती जाता येता, उगीच लाजते मी जवळ जाता काय करावं सुचत नाय...
 झोप येतच नाय...

 स्वप्नात माझ्या रोजच ती येते, स्वप्नातच त्या खूप काही होते
 खरं स्वप्न ते होईल काय...
 झोप येतच नाय...

 तिच्यासाठी मी रोज रोज झुरतो, कसं सांगू तिला मी किती प्रेम करतो
 तिला मन माझं कळेल काय... झोप येतच नाय...

 व्हावी ती माझी मला वाटतं असं, तिच्यासाठी करु कोण्या देवाला नवस
 देव कोणता नवसाला पावणार हाय...
 झोप येतच नाय...

 तिच्यासाठी मन माझं वेडं हे झालं,
कसं सांगू तिला माझे हे हाल सांगा चुकलं माझं काय...
 झोप येतच नाय....

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड ९८३४२९८३१५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance