STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

तुकाराम महिमा

तुकाराम महिमा

1 min
11

तुकाराम तीन
 होऊन गेले महान,
रशियात अण्णानं
 मिळविला बहुमान

 तुकाराम मुंढे
 त्यातील एक नाम
 भ्रष्ट व्यवस्थेला
 फोडीला घाम.

 संत तुकोबांची
आहे किती महती
पुष्पक विमानातून
 ते वैकुंठात जाती.

 ठेवा सारे ध्यानी
 तुकाराम महीमा
अण्णा भाऊंचा आहे
 फार अभिमान आम्हा.

 गातो या मुखाने
 मी अण्णांची महती
 बोला जय अण्णा
 आहे त्यांची जयंती...

 साहित्यरत्नाला या
 सन्मानीले रशियाने
 भारतरत्न द्यावे
 अण्णास शासनाने...

 दिड दिवस शिकून
 केले चकीत जगाला
 असा महान साहित्यिक
 न होणार न झाला.

 चिखलातील कमळ
हे जसे सुगंधी चंदन अण्णाभाऊंना माझे
 कोटी कोटी हे वंदन...

 गायकवाड रवींद्र दापकेकर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract