आशिर्वाद
आशिर्वाद
आईवडील गेल्यावर
कोण आपलं या दुनियेत,
कुणा म्हणावं आपलं
जपावं कोणतं नातं...
आईबाप एकच
नातं नाजूक भावा बहिणींचं,
जीव लावावा भावा बहिणीला
नातं नाजूक हे रक्ताचं...
नको नात्यात स्वार्थ
हवा ओलावा मायेचा,
नाजूक रेशमी बंधन
नाही कोणीच कोणाचा...
सुखदुःखात हवी साथ,
हवं भरोशाचं नातं,
अश्रू पुसणारे हात
नको विश्वासघात...
आपलं कोणीतरी असावं ,
भरोशाचं, जीवाभावाचं,
आईबाप गेल्यावर
सारं सरल जीवनाचं...
झुरावं रातदीन
क्षणोक्षणी आठवण,
भेटतील का आईबाप
गेल्यावर दुनियेतून...
गेल्यावर दुनयेतून
कळतं आईबापाचं
खरं मोल,
छत्र आईबापाचे हवे
आशिर्वाद त्यांचे अनमोल...
गायकवाड रवींद्र दापकेकर
