ये जन्मास पुन्हा...
ये जन्मास पुन्हा...
ये जन्मास पुन्हा...
'.
पुष्पाग्रज '
भिमा... भिमा...
येशील का सांग जन्मास पुन्हा,
ये बाबा ये जन्मास पुन्हा...
भरकटली ही तुझी चळवळ ,
परिवर्तनाचं नाही कुणात बळ ,
नाही समाजाची मुळीच तळमळ कुणा...१
नाही कळली कुणाला तुझी शिकवण ,
नाही समाजाचं कुणाला देणं घेणं ,
समजू खरा तुझा मी वारस कुणा...२
झालेत सारे भिमा तुला बेईमान,
चालेना कोणी इथे
तुझ्या विचारानं,
विचारीणा कोणी इथे तुझ्या लेकरांना...३
रक्तात नाही कुणाच्या आहे मुखातच भिम,
जयभीम बोलती करती करु नये ते काम ,
नाही कळाला धम्म नाही भिमराव कुणा...४
भिमाची पोरं झाली दंगली खोर,
महापुरुषांचा नाही डोक्यात विचार ,
तुच एक होतास भिमा वाली आम्हा...५
भिमामुळे झालो बघा आम्ही माणूस,
उपकार ते भिमाचे आम्ही विसरावे कसं ,
वंदितो, पुजतो करतो नमन तुम्हा...६
होतास आमचा भिमा तुच एक वाली,
गेलास सोडून आम्हा वेळ आम्हा
वाईट आली,
फोडीतो मी टाहो
शोधू कुठे तुम्हा...७
गायकवाड रवींद्र
दापकेकर नांदेड ९८३४२९८३१५
