शंभू महादेवा..
शंभू महादेवा..
शंभू महादेवा...
देवा रे देवा
शंभू महादेवा,
घुमतोय जयघोष
हर हर महादेवा...
श्रावण मासात
पुजीती भक्त गन,
आरती करीती
शंभू हो पावन...
नाव तुझी अनेक देवा
तू दे मज दर्शन,
महाप्रसाद वाटती
होई रोज अन्नदान...
इथं जिथे तिथं
तुझ्या दर्शनास रांगा
खडगधारी तू उभा
तुझ्या जटातून गंगा...
छत्रपतींनी केला
तुझा खरा जयघोष,
करून हर हर महादेव
केला दुष्टांचा नाश...
त्रिनेत्र, निळकंठा
शंभू, महादेव,शंकरा
करतो अभिषेक देवा
कृपा आम्हावरी करा...
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड
९८३४२९८३१५
जय माता महाकाली
'. पुष्पाग्रज '
रुद्र रूप मातेचे
जय माता महाकाली,
करी दुष्टांचा संहार
भक्त धाऊन हे आली...
होतो दिनरात
माते तुझा जयजयकार,
ये धाऊन संकटात
कर दुष्टांचा संहार...
हे माता महाकाली
ये अवतार घेऊन,
भय असुरांला वाटे
तुझे रुप खरे पाहून...
तुज पुजतो मी माते
तुझी करतो आरती
जय जय महाकाली
असो कृपा आम्हवरती ...
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड
