संकट
संकट
आले किती जरी संकटं आयुष्यात
जातील ते माघारी एवढी ठेवा हिंमत ...
काय म्हणून भ्यायचे उगीच संकटांना
आत्मविश्वास हवा झगडण्या झुंजण्यात...
माघार का घ्यायची त्या भिऊन संकटांना
सामर्थ्य आपलेच वाढवा तोंड देऊन संकटास...
हिंमत तुमची पाहून जावीत संकटे पळून
अशी ओळख तुमची हवी तुमच्या कर्तुत्वात...
तुम्ही तयार ठेवा स्वतःला
तोंड दयाया संकटाला
कधीच येणार नाहीत संकटं तुमच्या वाटेत...
ओळखल्यावर तुम्हाला होतील संकटं सारी दूर
माणतील ते हार
तुमच्या पहिल्या च प्रयत्नात...
कोण किती समर्थ कळतं त्या संकटांना
तुम्ही करा स्वागत त्यांचे व्हा यशस्वी आयुष्यात...
वाजेल यशाचा डंका, तोंड नसेल संकटांना
पुन्हा कधी न येतील ते संकटं आयुष्यात...
सांगा संकटांना मी तयार स्वागताला
सापडणार नाही त्यांना पाळण्यास ही वाट...
येतील कसे बरे तुमच्या वाटेत संकटं तुमच्यामुळे च सारी संकटे संकटात..
गायकवाड आर.जी.दापकेकर
