ये नाना ये
ये नाना ये
ये नाना ये...
सांगा ना सांगा ना
गेला कुठे नाना...
विचारु मी कुणा
शोधू कुठे नाना...
देवून दुःख मना
गेला कसा नाना,
कुठे मांडू संवेदना
भेटेल कुठे नाना...
येती अश्रू नयना
आठवणी पुन्हा पुन्हा
,
दुःख सकल जना
का रे का गेलास नाना...
नाही केला कोणता गुन्हा
नाही दुखावलं कुणा
आळवितो पुन्हा पुन्हा
ये रे बाबा ये नाना.
नाना नाना ये
पुन्हा जन्म घे,
तुझं अधुरं स्वप्न
पूर्ण होऊ दे....
डोळे भरून एकदा
आम्हाला पाहू दे...
ये नाना ये
ये नाना ये...
दापकेकर रविंद्र
नांदेड९८३४२९८३१५
