रावण दहन
रावण दहन
तुमचं माझं केलं काय
वाटोळं त्या रावनानं
दसऱ्याला करता काय
उगीच रावण दहन...
दरवर्षी करता दहन
तरी तुमच्यातील जीवंत रावण
तुमच्यातील त्या रावणाला
संपवणार सांगा कोण..
माणसं तुम्ही दहा तोंडी
सुधारणार सांगा कधी,
स्वतःमधील रावणाला
संपवावे आपण आधी.
खरा दसरा करु साजरा
आपल्यातील संपवून रावणाला,
विजयादशमी च्या याच
खऱ्या माझ्या शुभेच्छा तुम्हाला.
खऱ्या अर्थाने जेव्हा
इथे
संहार दुष्टांचा होईल,
आईबहीण आपली
सुरक्षित
जेव्हा राहील
रामराज्य येईल खरे
रोज दसरा, दिवाळी होईल,
स्वर्ग च अवतरेल भूवरी
मुखी जय श्रीराम राहील..
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड
९८३४२९८३१५
