STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

पाहून रंग रुपाला

पाहून रंग रुपाला

1 min
0

झाला वेडाच तो झाला 
पाहून रंग रुपाला 
सर्वस्व अर्पण तिला 
तिच्या प्रेमास हपापला...

पहिल्याच भेटीत दंग 
पाहून ते रुप रंग,
वाटे करावी ती संग 
 अंगाला भिडावे अंग...

तिच्या खऱ्या प्रेमापायी 
परवा कशाची च नाही,
रात्रंदिन झुरत राही
झोप ही येत नाही...

तीच ध्यानी, मनी स्वप्नी 
बेभान क्षणोक्षणी 
कधी होईल ती राणी 
विचार एक च हा मनी...

मदहोश तिची जवानी 
घातली तिने मोहीनी 
चुंबन ओठांचे घेऊनी
जावे चिर आनंदुनी...

ते स्वर्गसुख मिळेल 
खरी प्रित जुळेल,
हा जीव ही तळमळेल
भाग्य उजळेल 
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract