STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

दान...

दान...

2 mins
1

दान
 लोक देवाला दान का करतात माणसाला मदत का
नाही कुठे कळतं माणसाला देव या जगी आहे का नाही...

 गरीबीचा शाप घेऊन मरतात रोज किती बिचारे
उपासपोटी जगती कित्येक पैशाअभावी मरतात बरे...

 दिव्यांग, त्रस्त , अनाथ कित्येक अनंत दुःखात
 ओळखून दुःख कुणाचं देईना कोणी हात...

 आहे गरज खरी ज्याना करावे दान नित्य त्यांना
 देवाला जे करती दान काय म्हणावे त्या माणसाना...

 किलोने सोने, चांदी दान असेल किती मोठा तो स्वार्थ
 नसेल पापाची ती कमाई का असेल खरा परमार्थ...

 कोण्या मार्गाने कमावीले धन किती पवित्र मनाने करीता दान
 गरीबांना द्या थोडे अन्न करा कुणाचे सुखी जीवन...

 किती माणसाची कमाल करी देवाला धन दान
 कोण्या देवानं मागितलं माणसाला चांदी, सोनं...

 नाही देवावून कमी हा माणूस धन दानी,
कुठे करावे दान कळेना एवढा कसा अडाणी...

 अरे धनदांडग्यांनो नका पापाई कमाई
 करावं तिथं करा दान देव भिकारी रे नाही..

 कोणताच देव नाही मागत काहीच माणसाला
 स्वार्थापोटी माणूस वेडा दावी लालच देवाला...

 स्वार्थापुढे माणसाला कसं कळत काहीच नाही
 त्याला वाटे करावं पुण्य पण पापच मोठं होई...

 व्वा रे व्वा माणसा जन्मभर जग लुटून
 करी देवाला तू दान कसं होईल रे कल्याण...

 तुझी पापाची कमाई कसा देव स्विकारील
तू विकत घेऊन त्याला देव करील कसं भलं...

 तुला कळतं रे काय तुला नाही कळला देव
 तुझं पाप पुण्य वेड्या त्याला असतं सारं ठाव...

 त्याचं देवाने माणसाला आता थोडी बुद्धी द्यावी
 कुठे करावे दान किती याची त्याला अक्कल यावी...

   ज्यांच्या कडे आहे त्यांनी करावे दान खुशाल,
व्हावे निश्चित कल्याण त्याने लाभो त्याला दृष्टी विशाल...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract