माणूस हैवान झाला..
माणूस हैवान झाला..
कोणी उपाशी आहे इथं
कुणाला खाल्लेले नाही पचत
खाऊन मुळव्याध , आम्लपित्त
कुणाला साखर होई जास्त...
कोणी गाळतो रोज घाम
कुणाला जास्त होई आराम
हातपाय हालवून करी व्यायाम
कुणाला शोधून न मिळे काम...
होई जगणे कुणा कठीण
कुणाला कळे न हे जीवन
कोणी लोळतो रात्रंदिन
राबतो कोणी रात्रंदिन...
कोणी फार धडपडतो
खाऊन पिऊन बडबडतो
दुःखाने कोणी तडफडतो
कोणी जीव उगीच सोडतो...
जीवन न्यारं प्रत्येकाचं
न्यारं सुख ज्याचं त्याचं
कोणी नाही कुणाचं
आहे अवघड गरीबाचं...
कोणी किंमत कोणाला देईना
कोणी आपलं वेळेला होईना,
कुणासाठी कधीच कुणाच्या डोळा पाणी येईना...
जगायचं मरायचं
आहे प्रत्येकाला
नाही देणं घेणं कोण कसा मेला
झाला माणूस हैवान झाला
माणूस म्हणू मी कुणाला....
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड
