मानवता धर्म
मानवता धर्म
- मानवता धर्म
- ' पुष्पाग्रज '
- असो कोणी दुःखी मोठ्या संकटात,
- एकमेकां द्यावा मदतीचा हात...
- पुसावेत अश्रू बुडत्याला आधार,
- पाठीवर थाप जपावे नातं...
- मित्र तोची खरा धाऊन दुःखात येईल,
- खरी साथ देई नित्य संकटात...
- मानवता धर्म जपावा माणसाने,
- करावे दया,दान या जीवनात...
- मदतीचा हात द्यावा आणि घ्यावा,
- देतो तो देव ठेवा लक्षात...
- गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड ९८३४२९८३१५
