आईवडीलांचा सहवास...
आईवडीलांचा सहवास...
सुख, आनंद आणि संस्कृती
खेड्यांच्या मातीत पेरला आहे
अन् आम्ही तर वेगळाच रस्ता धरला आहे...
माया,नाती जीवाळा आहे जीवंत खेडोपाडी
कोणी बोलत थांबून गोड असते आपुलकी केवढी!
या शहरी चाळ गल्लीत नसे ठावे कोण कुठला माणूस मोकळ्या मनाचा नाही बोलणारा भेटला.
कोणी विचारीना कोणाला नाव नी गाव असला कितीही श्रीमंत तरी कोणी च देईना भाव...
तोष, बिस्कीट, चहा, पोहे एवढंच इथलं जीणं
पचवण्यासाठी धावतात हैराण शुगर,बिपी,ॲटकनं
इथे ना नाती ना माणूस माणसात, जन्माची धावपळ रोज हाव खेळायची पैशात...
कुठेच कोण्या मजल्यावर सुख उरलं नाही
चेहऱ्यावर ना हसू कोणाच्या मन कधीच भरलं नाही...
मातीच्या सुगंधापायी गोड गळाभेटीसाठी
मन धावतंय गावाकडे
गावच्या त्या मातीसाठी...
आईवडीलांचा सहवास ,भरवलेला गोड घास,
आठवतात अजून सारे मातीतले सारे दिस...
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड
