STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

होऊ दे भले

होऊ दे भले

1 min
0

दुसऱ्याचं वाईट नी
 आपलं भलं व्हावं
 असं ज्यांना वाटतंय
 त्यांचं होईल का सांगा भलं...

 वाईट सदा वागून
लबाडी लुटालूट करून
 घर जरी भरलं तरी ही
 त्यांचं झालं का भलं...

 नको त्या मार्गाने कोणी
 कितीही जरी कमावलं
फुकटच लोकांचं खाल्ले 
तरीही त्याचं नाही झालं भलं...

 संपत्तीचा हाव करून
ज्यांनी संतती गमावलं
त्यांच्या आयुष्याचं झालं
सारंच की वाटोळं...

 किती जरी काही कमावलं
नी इज्जतच गमावलं
चार लोकात नाक खाली झालं 
त्यांच काय सांगा असतं भलं... 

 भल्या मार्गाने प्रामाणिकपणे
 जे कमविले इज्जतीने
फुकटचे नको खाणे
तेच आहे भले...
नको हरामाचे लुटून
 कुणा खाणे
 भल्या माणसा
होऊ दे भले..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract