कधी कळेल ग..
कधी कळेल ग..
कधी तुला हे कळलं ग...
तुला पाहून मी झालो वेडा
कधी तुला हे कळेल ग...
काय हवं ते सांगतो तुला
कधी मला ते मिळेल ग...
तुझ्या प्रेमाचा मी भुकेला
कधी प्रेम माझं हे कळेल लं ग...
तुला अर्पण माझं सर्वस्व
कधी प्रित ही जुळेल ग...
मी झुरतो रोज तुझ्यासाठी
तुझा जीव कधी तळमळेल ग...
मी फिदा तुझ्यावर साऱ्या जगाला कळेल ग...
ये मिठीत मी घेतो तुला
स्वर्गसुख ते मिळेल ग...
कर स्विकार या प्रेमाचा
जग तुझ्यावर जळेल ग...
तुझ्या ओठांचं चुंबन
गोडी अमृताची कळेल ग...
बाहुपाशात तू आल्यावर
माझं नशीब उजळेल ग...
तुझ्या परीस स्पर्शाने
सोनं आगीत जळेलं ग...
तू माझी मी तुझा ग
जग दोघांना छळेल ग...
बहार प्रेमाला येऊन
सुख चरणी लोळेल ग...
लैला मजनू तू अन् मी
खरी प्रित जगा कळेल ग...
मी आतुर प्रेमाला
कधी प्रेम प्रेमाला मिळेल ग...
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड
