STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

मित्र...

मित्र...

1 min
7

मित्र...
 'पुष्पाग्रज '
 अरे धोक्यामंदी धोका
 दिला मित्राने चांगला,
ज्याला समजलं जीवलग
 तोच जीवावर बेतला...

 सुख दुःखात देतो साथ
 तोच असतो मित्र खरा,
ज्याला समजलो खरा
 त्याने च तर धोका दिला...

 जोडावेत मित्र खरे
जीवाला जीव देणारे,
 जीव आपलाच घेई
म्हणावे का मित्र त्याला...

 खरा एक आहे मित्र
 ज्याची मला आहे साथ,
 दोघे एक सुख दुःखात
 आधारच जगण्याला...

 ओळखा रे मित्र शत्रू
 नको व्हावी गफलत,
 नको लाख हवा एकच
 खरा मित्र आयुष्यात...

 कितीही असो संकट मोठं
 असते मित्रांचीच साथ
 मित्र तोच असतो खरा
 येतो धावून संकटात...

 नको मला दुसरे काही
 मागणे एकच देवा तुला,
संकटात ज्याची साथ
 दे असा एक मित्र मला...

 जीवाला जीव देणारे
 जोडावेत मित्र असे,
मित्राविणा मित्रा
 जीवनालाअर्थ नसे...

वाटे जगालाच हेवा 
देव पावला नवसास,
मला दिला रे देवाने 
मित्र एक असा खास 

 रवींद्र दापकेकर नांदेड ९८३४२९८३१५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract